Kirit Somaiya : ”उद्धव ठाकरेंना वाटतं ते माफिया सेनेचे माफिया सरदार’
1038 कोटी रुपयांचा घोटाळा याचा प्रविण राऊत मुख्य आरोपी होते. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले. त्या पैशातून अलिबाग आणि दादरला जमीन खरेदी करण्यात आली. कारवाईच्या भीतीनं संजय राऊत यांनी 55 लाख परत केले, असं किरीट सोमय्या म्हणाले.
संजय राऊत (Sanjay Raut) आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार पुढे आले आहेत. अलिबाग (Alibag) येथील काही जमीनी, संपत्ती आणि दादर येथील फ्लॅट जप्त (Seized) करण्यात आला आहे. संजय राऊतला अगोदरच लक्षात आलं होतं. त्यामुळं 10 महिन्यापूर्वी ईडी कार्यालयात 55 लाख रुपये परत केले होते. ईडीची चौकशी सुरु होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड सुरू होती. किरीट सोमय्यांवर आरोप केले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना वाटतं की पोलिसांचा माफियाप्रमाणं वापर करुन ईडी, सीबीआय, आयटी अधिकारी यांची तोंडं बंद करु शकतो. मात्र, संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 1038 कोटी रुपयांचा घोटाळा याचा प्रविण राऊत मुख्य आरोपी होते. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले. त्या पैशातून अलिबाग आणि दादरला जमीन खरेदी करण्यात आली. कारवाईच्या भीतीनं संजय राऊत यांनी 55 लाख परत केले, असं किरीट सोमय्या म्हणाले.