काहीही करा झुकणार नाही, Mohit Kamboj यांची मुंबई महापालिकेच्या नोटिशीवर प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना नोटीस पाठवली आहे. तर काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांना नोटीस पाठवली आहे. मोहित कंबोज यांच्या खुशी पॅराडाइज इमारतीत काही अतिरिक्त बांधकाम करण्यात आले आहे, अशी पालिकेला शंका आहे. 23 मार्च रोजी मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी इमारतीचा पाहणी करण्यासाठी येणार आहेत, असा नोटिशीमध्ये उल्लेख आहे. काही महिन्यांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. मोहित कंबोज यांनी नोटीसची माहिती ट्विट करून दिली. त्यांनी सांगितले, की खोटा गुन्हा दाखल करू शकला नाहीत, म्हणून मुंबई महानगरपालिकेने माझ्या घरी नोटीस पाठवली आहे. कंगना रनौत असो किंवा नारायण राणे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू शकले नाहीत. तर आता घर तोडायचे. काहीही करा पण महाविकास आघाडी सरकारसमोर मी झुकणार नाही, असेही कंबोज यांनी म्हटले आहे.
Published on: Mar 22, 2022 05:48 PM