Chhagan Bhujbal | ‘Nawab Malik आणि Dawood Ibrahim कनेक्शन थोतांड’
नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. त्यांचे दाऊद या दहशतवाद्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्यानं केला जात आहे. यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीकास्त्र सोडलंय.
नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. त्यांचे दाऊद या दहशतवाद्याशी संबंध असल्याचा आरोप भाजपाकडून सातत्यानं केला जात आहे. यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीकास्त्र सोडलंय. या केसमध्ये दाउद अँगल येत नाही. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायला दाउद अँगल निर्माण केला जात आहे. हे थोतांड आहे. हे असं उभं करून दाऊदचं नाव लावायचं, म्हणजे सामान्य माणूस चिडतो. हे सर्व कोर्टात मांडलं जाईल. कायदेशीर लढाई लढावी लागेल, असं भुजबळ म्हणाले आहेत. दरम्यान सरकारमधील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक झाली. यात जी कोठडी दिली आहे, त्यावर चर्चा झाली. तसेच जामीन कसा मिळवता येईल याविषयीही चर्चा झाली. याप्रकरणी तीनही पक्षांचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शांततेत आंदोलन करतील, नवाब मलिकांचं समर्थन करतील, अशी माहिती त्यांनी दिली.