Nandurbar : हायवेजवळ Container आणि Ertiga गाडीचा भीषण आपघात

| Updated on: Mar 25, 2022 | 5:29 PM

नंदुरबार (Nandurbar) निझर रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास कंटनेर आणि अर्टिगा गाडी यांच्या भीषण अपघात (Accident) झाला आहे. हॉटेल (Hotel) हायवेजवळ झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले आहेत.

नंदुरबार (Nandurbar) निझर रस्त्यावर रात्री एकच्या सुमारास कंटनेर आणि अर्टिगा गाडी यांच्या भीषण अपघात (Accident) झाला आहे. हॉटेल (Hotel) हायवेजवळ झालेल्या या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अपघातात हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे हे तिघे मृत झाले आहेत. यातील प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होते. अर्टिगा ही कंटेनवर मागून धडकल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे हा 753 ब असा शेवाळी नेत्रंग महामार्ग असून गुजरातूमधून होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे या रस्त्याचे बारा वाजले आहे. त्यातच रस्त्याच्या साइडपट्ट्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे. त्यामुळेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. हा अपघातही त्यामुळे झाला असून वाहनाची त्यानंतर कशी अवस्था झाली, हे समोर आले आहे.

Published on: Mar 25, 2022 05:29 PM
Pimpri Crime| पिंपरीत शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पटचे लालसा पडली आठ कोटींना ; 37 जणांची फसवणूक
Aurangabad | महापालिकेची निवडणूक कधी? इच्छुकांची प्रतीक्षा पणाला, विलंबाची कारणं काय?