Sangali | खानापुरात महाशिवरात्रीनिमित्त घातलं गाईचं डोहाळ जेवण
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला (Cow) वेगळे असे महत्त्व आहे. ते महत्त्व तर अबाधित ठेवले जात आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे असाच डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा महाशिवरात्रीनिमित्त रंगलेला होता.
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला (Cow) वेगळे असे महत्त्व आहे. ते महत्त्व तर अबाधित ठेवले जात आहे. पण काही शेतकरी (Farmers) गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सांगली (Sangli) जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद येथे असाच डोळ्याचे पारणे फिटेल असा सोहळा महाशिवरात्रीनिमित्त रंगलेला होता. गावात प्रथमत:च असा आगळा-वेगळा कार्यक्रम संपन्न झाल्याने परिसरात तो चर्चेचा विषय बनला आहे. येथील माजी सरपंच भगवान हारुगडे यांच्या कुटुंबीयांनी गायीचेच डोहाळे जेवण घातले आहे. सर्वकाही विधीवत करून आख्ख्या गावाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या निमित्त विविध कार्यक्रम हे हारगुडे यांच्या घरी पार पडले. महिलांसह गावकऱ्यांनीही या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमास हजेरी लावत या चांगल्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.