Beed | Dhananjay Munde यांनी स्वत: Rajeshwar Chavan यांना बांधला फेटा

| Updated on: Mar 13, 2022 | 3:23 PM

बीड (Beed) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झालीय. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी राष्ट्रवादी भवन येथे पदभार स्वीकारला आहे.

बीड (Beed) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झालीय. पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी राष्ट्रवादी भवन येथे पदभार स्वीकारला आहे. दरम्यान यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदभार समारंभ प्रसंगी धनंजय मुंडे यांनी स्वतः राजेश्वर चव्हाण यांना फेटा बांधून त्यांचा सत्कार केलाय. स्वतः धनंजय मुंडेंनी चव्हाण यांना फेटा बांधल्याने याची चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या जिल्हाध्यक्षाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सुरू असताना राजेश्वर चव्हाण यांचा पदभाराचा कार्यक्रम एका आगळ्याच पद्धतीने करण्यात आला. स्वत: धनंजय मुंडे यांनी राजेश्वर चव्हाण यांना फेटा बांधला.

VIDEO | महाराष्ट्रात बदल्यांचा महाघोटाळा; रसद केंद्रीय गृहसचिवांना दिली, फडणवीसांचा धमाका!
Anil Bonde | ‘Nitin Raut वरूड-मोर्शीला आले तर लोक त्यांचं चपलांचा हार टाकून स्वागत करतील’