वाढलेल्या उन्हामुळे डीपीनं घेतला पेट, Nashikच्या बागलाण परिसरातली घटना
नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील एका शेतातील () रोहित्राने अFarmचानक पेट घेतल्याने परिसरात शेतकऱ्यांची (Farmers) चांगलीच तारांबळ उडाली. उन्हामुळे रोहित्राला आग लागल्याचे सांगितले जात असून रोहित्र पूर्णपणे जाळून खाक झाला आहे.
नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील एका शेतातील () रोहित्राने अFarmचानक पेट घेतल्याने परिसरात शेतकऱ्यांची (Farmers) चांगलीच तारांबळ उडाली. उन्हामुळे रोहित्राला आग लागल्याचे सांगितले जात असून रोहित्र पूर्णपणे जाळून खाक झाला आहे. त्यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वाढत्या उन्हात असे प्रकार होत असून त्यापासून दूर राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे. तर तापमानात झपाट्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. या उष्णतेने काही ठिकाणी आगीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. अशीच घटना बागलाणमध्येही पाहायला मिळाली. रोहित्राने पेट घेतल्याने शेतकऱ्यांची येथे मोठी धावपळ उडाली. अशा घटना अचानक होऊ शकतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी रोहित्राच्या जवळपास जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.