Nashik Fire | Igatpuriमधील Plastic पुतळे बनवणाऱ्या कंपनीला आग, जीवितहानी नाही
इगतपुरी (Igatpuri) शहर हद्दीतील तळेगाव शिवारात असलेल्या कंपनीत भीषण आगीची (Fire) घटना घडली. गोयंका प्लास्टिक असे कंपनीचे नाव आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इगतपुरी (Igatpuri) शहर हद्दीतील तळेगाव शिवारात असलेल्या कंपनीत भीषण आगीची (Fire) घटना घडली. गोयंका प्लास्टिक असे कंपनीचे नाव आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे (Short circuit) लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीत प्लास्टिकचे पुतळे तयार होत होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कारखाना बंद होता. आगीत संपूर्ण प्लास्टिकचे पुतळे जळून खाक झाले आहेत. आगीनंतर आकाशात लोटले धुराचे लोट पाहायला मिळाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीच्या घटनेनंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच अग्निशामक दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केले. आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीनंतर संपूर्ण परिसरात धुराचेच साम्राज्य निर्माण झाले होते.