Gadchiroli | 20 लाख इनाम असलेल्या दोन नक्षलींचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

| Updated on: Mar 17, 2022 | 5:26 PM

टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली (Gadchiroli) पोलीस दलास (Police Department) मोठे यश मिळाले आहे. 20 लाख रू. इनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांनी (Naxals) आत्मसमर्पण केले आहे.

टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली (Gadchiroli) पोलीस दलास (Police Department) मोठे यश मिळाले आहे. 20 लाख रू. इनामी असलेल्या 02 जहाल नक्षलवाद्यांनी (Naxals) आत्मसमर्पण केले आहे. दीपक ईष्टाम व शामबत्ती आलाम हे दोघे पती-पत्नी असून ते दोघेही प्लाटुन क्र. 21मध्ये कार्यरत होते. दीपक ईष्टाम हा डीव्हीसी पदावर तर शामबत्ती आलाम ही प्लाटुन सदस्य म्हणून कार्यरत होते. दीपक ईष्टाम याच्यावर खूनाचे 03, चकमकीचे 08, जाळपोळ 02 असे गुन्हे दाखल आहेत. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन 2019 ते 2022 सालामध्ये आतापर्यंत एकूण 45 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यामध्ये 5 डीव्हीसी, 02 दलम कमांडर, 03 उपकमांडर, 34 सदस्य व 01 जनमिलीशिया यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 649 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलिसांतर्फे त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
Published on: Mar 17, 2022 05:25 PM
Nagpur | अर्धवट जळलेल्या तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं! आत्महत्या केल्याचं उघड, का दिला जीव?
Nashik | सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?