Hapus : स्थानिक बाजारात आंबा 15 दिवस उशिरानं दाखल, भाववाढीमुळे खवय्यांना पाहावी लागणार वाट
फळांचा राजा अर्थात हापूस (Hapus) आंबा (Mango) स्थानिक बाजारात दाखल झालाय. स्थानिक बाजारात येवूनसुद्धा सर्वसामान्यांच्या खिशाला हा आंबा परवडणारा नाही. कारण स्थानिक बाजारातसुद्धा सध्या आंब्याचा दर (Rate) हा चढाच आहे.
फळांचा राजा अर्थात हापूस (Hapus) आंबा (Mango) स्थानिक बाजारात दाखल झालाय. स्थानिक बाजारात येवूनसुद्धा सर्वसामान्यांच्या खिशाला हा आंबा परवडणारा नाही. कारण स्थानिक बाजारातसुद्धा सध्या आंब्याचा दर (Rate) हा चढाच आहे. चांगल्या दर्जाचा हापूसचा स्थानिक बाजारात दर हा एका डझनाला 1200 ते 2000पर्यंतचा भाव आहे. रत्नागिरी जवळच्या पावस गणेशगुळे आणि गणपतीपुळे इथून स्थानिक बाजारात आंबा दाखल झालाय. स्थानिक बाजारात 15 दिवस उशिराने आंबा दाखल झालाय. आंब्याचे दर कमी होण्यासाठी खवय्यांना मे महिन्याचीच वाट पहावी लागणार आहे, असे दिसत आहे. हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्येच थंडी तर मध्येच पाऊस यामुळे आंबा बागायतदारांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे फळांचा राजा 15 दिवस उशिराने दाखल झाला आहे.