Scam | पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा

| Updated on: Mar 16, 2022 | 5:22 PM

वारजे माळवाडी (Warje Malwadi) भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा (Scam) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक (Cheating) केली आहे.

वारजे माळवाडी (Warje Malwadi) भागात रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीमध्ये 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा (Scam) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या हक्काच्या सदनिका दुसऱ्याच लोकांना विकून ही फसवणूक (Cheating) केली आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात या सोसायटीचे चेअरमन अंबादास गोटे आणि सेक्रेटरी गणेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पाच एकर जागेवर भटक्या विमुक्त समाजातील लोक राहत होते. मात्र त्यावेळेस या लोकांची फसवणूक करत हे फ्लॅट परस्पर विक्री करण्यात आले. यामुळे याविरोधात लढा देणाऱ्या नागरिकांनी आम्हाला आमची घरे परत मिळावीत, अशी मागणी केली आहे. कामगार कंत्राटदार दीपक अशोक वेताळ (वय 40, रा. मोशी) यांनी याविषयी तक्रार दाखल केली.

Published on: Mar 16, 2022 05:22 PM
Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
Aurangabad | महापालिकेची घंटागाडी वेळेवर येत नाही? औरंगाबादकरांनो, कॉल करा आणि 5 तासात समस्या दूर करा