Aurangabad : गर्भपाताच्या कीटची औरंगाबादेच होतेय अवैध विक्री, मेडिकल चालकानं केला भांडाफोड
औरंगाबादेत (Aurangabad) गर्भपाताच्या किटची (Abortion kit) बेकायदेशीर (Illegal) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेडिकल चालक निखिल मित्तल यांनी ऑनलाइन पद्धतीने गर्भपात किट मागवून हा भांडाफोड केलाय.
औरंगाबादेत (Aurangabad) गर्भपाताच्या किटची (Abortion kit) बेकायदेशीर (Illegal) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन साइटच्या माध्यमातून गर्भपाताच्या किटची विक्री केली जात आहे. बेकायदेशीर किट विक्रीचा एका मेडिकल चालकाने भांडाफोड केला आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अवैध गर्भपात कीट विक्रीची पोलखोल आता झाली आहे. मेडिकल चालक निखिल मित्तल यांनी ऑनलाइन पद्धतीने गर्भपात किट मागवून हा भांडाफोड केलाय. दरम्यान, अन्न औषध प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.