Pune | जातेगाव बुद्रुकमध्ये दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादावरून तुफान हाणामारी

| Updated on: Mar 18, 2022 | 5:54 PM

पुणे जिल्ह्याच्या शिरूर (Shirur) तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे दोन कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून (Land dispute) तुफान हाणामारी झाली असून या मारहाणीत अनेकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे समोर आले आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर (Shirur) तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथे दोन कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. जमिनीच्या वादावरून (Land dispute) तुफान हाणामारी झाली असून या मारहाणीत अनेकांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे समोर आले आहे. दोन चुलत भावांमध्ये जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली आहे. या मारहाणीत महिला-पुरुष दोघेही जखमी झाले आहेत. याचा व्हिडीओ tv9 च्या हाती लागला आहे. या प्रकरणी अद्याप शिक्रापूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून पोलीस या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या कुटुंबाने केला आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला दोन्हीकडील कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. दोन्ही चुलत भाऊ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना मारहाण करत मोठा वाद घातला. पोलीस आता काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

Dilip Tadas | शिक्षक भारतीचे प्रा. दिलीप तडस यांचे निधन, विदर्भातील शिक्षण क्षेत्राची मोठी हानी
Birthday Special | दोन वेळा आमदार, समाजकारणात रस, टेनिसवर प्रेम; पंकज भुजबळांचा प्रवास!