Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी विजेत्याला शासकीय नोकरी हवी! बघा काय म्हणताय विजय चौधरी
महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी यांनी यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला लावली हजेरी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा दर्जा हा राज्यभरात आहे. तब्बल ६० वर्षांपासून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा सुरू आहे. मॅट आणि माती विभागातून एकूण ४० स्पर्धकांचा महाराष्ट्र केसरीमध्ये सहभाग असतो. या चुरशीच्या लढईत दोघांपैकी एका विजेत्याला चांदीची गदा जिंकण्याचा मान मिळतो.
दरम्यान, महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी यांनी यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले, मला ज्या प्रमाणे सरकारने खात्यात रूजू करून महाराष्ट्र केसरीच्या मल्लाला जो दर्जा दिला, तोच इथून पुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला दिला गेला पाहिजे आणि त्यांना देखील चांगली नोकरी सरकारकडून देण्यात आली पाहिजे. पुढे विजय चौधरी असेही म्हणाले की, महाराष्ट्र केसरी नावातच वजन आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे बक्षीस देखील विशिष्ट असून पहिल्यांदाच Mahindra Thar आणि पाच लाख रूपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याने महाराष्ट्र केसरी विजेत्यासाठी एकप्रकारे ही पर्वणी ठरणार आहे.