Unseason rain | जळगावच्या Chalisgaonमध्ये मध्यरात्री अवकाळी पाऊस

| Updated on: Mar 09, 2022 | 5:30 PM

जळगावच्या (Jalgaon) चाळीसगावात मध्यरात्री रात्रीपासून विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस (Unseason rain) झाला. या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा संकटात सापडलाय.

जळगावच्या (Jalgaon) चाळीसगावात मध्यरात्री रात्रीपासून विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस (Unseason rain) झाला. या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी (Farmers) पुन्हा एकदा संकटात सापडलाय. या पावसाचा कांदा, मका, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा इत्यादी पिकांना मोठा फटका बसणार आहे. चाळीसगावला आलेल्या महापुरात शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे पूर्णतः नुकसान झाले होते. त्यातून कुठे सावरत असताना आता अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल घास हिरावून नेल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे. दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण होते. त्यात काल काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारांचाही वर्षाव झाला. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जळगाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मालेगावात व्यावसायिकाच्या ऑफिसमधून 21 लाखांची चोरी, चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक हैराण
Good News | सोशल मीडियाचा सकारात्मक वापर सांगणाऱ्या दियाला युरोपियन युनियनची शिष्यवृत्ती, औरंगाबादचा अभिमान