‘Anil Parab यांची File तयार , लवकरच ED त्यांना अटक करेल’, आमदार Ravi Rana यांचा दावा
मी अमरावतीत (Amravati) नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्याविरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दबावात झाले, अशी टीका रवी राणा (Ravi Rana) यांनी केलीय.
मी अमरावतीत (Amravati) नसतानाही पालकमंत्री यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र केले. माझ्याविरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या दबावात झाले, अशी टीका रवी राणा (Ravi Rana) यांनी केलीय. जर महविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत असेल तर सामान्य जनतेचे काय? मविआच्या नेत्यांना याचा जबाब द्यावा लागेल. या सरकारचे अनेक मंत्री ईडीच्या (ED) रडारवर आहे. मी दिल्लीत असताना माझ्यावर 307चा गुन्हा दाखल करतात. ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल, त्याचबरोबर सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळेदेखील समोर येतील, असे राणा म्हणाले.