Ambedkar Jayanti 2022 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तू पाहिल्यात का ?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आयुष्यात नेमके कोणत्या वस्तू वापरायचे. त्या वस्तू कशा होत्या याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
नागपूर : आज महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Dr. Babasaheb Ambedkar) यांची जयंती (Birth Anniversary) आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे (Corona) सावट होते. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी काही मर्यादा आल्या, मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाले असून, राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे आज मोठ्या धुमधडाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आयुष्यात नेमके कोणत्या वस्तू वापरायचे. त्या वस्तू कशा होत्या याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. नागपूर जिल्ह्यातील चिचोली इथे या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. पाहुयात आमच्या प्रतिनिधी गजानन उमाटे यांचा रिपोर्ट.
Published on: Apr 14, 2022 05:41 PM