Nawab Malik यांच्या ईडीच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारात त्यांना ईडीने (ED)अटक केली आहे. आज त्यांना कोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. कारण मलिक यांचा जामीन फेटाळला आहे. मलिक (Nawab Malik custody) यांना 7 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) सध्या अटकेत आहेत. जमीन व्यवहारात त्यांना ईडीने (ED)अटक केली आहे. आज नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा दणका दिला आहे. कारण नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला आहे. नवाब मलिक (Nawab Malik custody) यांना 7 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावरून अधिवेशनातही मोठा पॉलिटिकल राडा झाल्याचे दिसून आले. एखादा मंत्री जेलमध्ये आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. दरम्यान, दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशा घोषणा विरोधकांनी आज दिल्या. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदशी संबंधित व्यक्तींकडून जमिनी विकत घेण्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.