ऑपरेशन गंगावर राजकारण करण्याची गरज नाही, V. Muraleedharan यांचा Sanjay Raut यांना टोला

| Updated on: Mar 02, 2022 | 4:24 PM

ऑपरेशन गंगावर (Operation ganga) आक्षेप घेण्याची गरज नाही, यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V. Muraleedharan) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात (Pune) आले, त्यावेळी ते बोलत होते.

ऑपरेशन गंगावर (Operation ganga) आक्षेप घेण्याची गरज नाही, यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन (V. Muraleedharan) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात (Pune) आले असता त्यांना याविषयी विचारल्यानंतर हे मत व्यक्त करत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर प्रदेश निवडणूक आणि याचा काही संबध नाहीय. सुमारे 20 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले होते. त्यामधील 4 हजार लोक 24 तारखेच्या आधी आले आहेत. कालपर्यंत 2 हजारपेक्षा अधिक लोक भारतात परतले आहेत. बाकी लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पोलंड, हंगेरी आणि शेजारील देशांच्या मदतीने लोकांना भारतात परत आणले  जात आहे, अडकलेल्यांना परत आणणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
PHOTO: आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते…!
Aurangabad | रखडलेल्या घरकुल योजनेसाठी आता मनपाची कसरत, आत्ता कुठे जमीन मिळाली, 31 मार्च पर्यंतच मुदत!