Bhor येथील औद्योगिक वसाहतीसाठी 3 हजार 105 शेतकऱ्यांना नोटीस
पुण्याच्या (Pune) भोर (Bhor) तालुक्यातील उत्रौली आणि वडगाव डाळ येथे प्रस्तावित असलेल्या, औद्योगिक वसाहतीसाठी (Industrial estate) आरक्षित केलेल्या आणि सातबारा उताऱ्यावर आरक्षित असल्याचा शिक्का मारलेल्या 3 हजार 105 शेतकऱ्यांना संमती अथवा नकाराबाबत नोटीस बजावण्यात आल्यात.
पुण्याच्या (Pune) भोर (Bhor) तालुक्यातील उत्रौली आणि वडगाव डाळ येथे प्रस्तावित असलेल्या, औद्योगिक वसाहतीसाठी (Industrial estate) आरक्षित केलेल्या आणि सातबारा उताऱ्यावर आरक्षित असल्याचा शिक्का मारलेल्या 218 हेक्टर 83 आर क्षेत्रातील, 3 हजार 105 शेतकऱ्यांना संमती अथवा नकाराबाबत नोटीस बजावण्यात आल्यात. 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना म्हणणे मांडण्याच्या सूचना देण्यात आल्यात. जे शेतकरी ही माहिती देणार नाहीत त्यांची संमती आहे, असे गृहीत धरले जाणार आहे, अशी माहिती भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे. तसा अहवाल भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य अद्योगिक विकास महामंडळाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटेंनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता, शेतकऱ्यांच्या जमिनीला आजच्या बाजारभाव दराने पाचपाट मोबदला देण्यात याला, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ती मान्य झाल्यास शेतकरी संमती देतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता भोरच्या औद्योगिक वसाहतीकडे बेरोजगारांची नजर लागली आहे.