Prakash Shendage | ‘ओबीसींचा अहवाल तज्ज्ञांकडून करा, सर्वोच्च न्यायालयात हरल्यास राज्य सरकार जबाबदार’

| Updated on: Feb 25, 2022 | 4:59 PM

ओबीसी (OBC) नेता प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी ओबीसींच्या आरक्षणावरून (Reservation) राज्य सरकारवर टीका केली आहे. तज्ज्ञांची नेमणूक करून इंपिरिकल डाटा गोळा करा, चुका सुधारा, ओबीसींचा अहवाल तज्ज्ञांकडून करा, असे त्यांनी म्हटले आहे.

ओबीसी (OBC) नेता प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी ओबीसींच्या आरक्षणावरून (Reservation) राज्य सरकारवर टीका केली आहे. तज्ज्ञांची नेमणूक करून इंपिरिकल डाटा गोळा करा, चुका सुधारा, ओबीसींचा अहवाल तज्ज्ञांकडून करा, असे त्यांनी म्हटले आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने घटनात्मक भूमिका निभावली आहे. या आयोगावर तज्ज्ञांची वर्णी लागायला हवी, पण या सरकारने स्वत:ची पोळी भाजण्यासाठी स्वत:च्या लोकांची नियुक्ती केली, ओबीसी समाजाला धोका आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. आयोगातल्या या सदस्यांनी दिलेला अहवाल सुप्रीम कोर्टात फेटाळला जाण्याचीच शक्यता आहे. कारण यातील सदस्य किती तज्ज्ञ आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी हरल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, त्यामुळे चुका सुधारा, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.