Gondia Accident | गोंदिया जिल्ह्यात ट्रक-दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू

| Updated on: Mar 06, 2022 | 4:24 PM

आमगाव-गोंदिया महामार्गवरील सध्या रस्त्याचे काम (Road work) सुरू असून  त्यामुळे अनेक अपघात (Accident) या मार्गावर होत असतात. आज दहेगाव येथे ट्रक व दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू (Died) झाला आहे.

आमगाव-गोंदिया महामार्गवरील सध्या रस्त्याचे काम (Road work) सुरू असून  त्यामुळे अनेक अपघात (Accident) या मार्गावर होत असतात. आज दहेगाव येथे ट्रक व दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू (Died) झाला आहे. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाल्याची घटना घटना घडली आहे. अपघातात दिनेश चंद्रप्रकाश पहिरे (वय 24,  रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया) हा तरूण मृत्यूमुखी पडला आहे. आमगाव गोंदिया महामार्गावरून टिप्पर एमएच 25  एजे  2644 आमगावकडून गोंदियाकडे जात होता. त्याचवेळी ट्रकच्या पाठीमागून दुचाकी एमएच 35 यू  2552  येत होती. ओव्हरटेक करीत असताना दुचाकीचालक खाली पडला.  ट्रकच्या मागील चाकात आल्यामुळे दिनेश पहिरे जागीच ठार झाला. तर टिप्पर चालक हा टिप्पर जागेवर सोडून फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संभाजी ब्रिगेडने अडविला पालकमंत्र्यांचा ताफा, सक्तीच्या वीजबिल वसुलीवर भरणे मामांनी काय सांगितला मधला मार्ग?
स्वयं प्रकाशित व्हा, नवनिर्मिती करा, धाडसीवृत्ती वाढवा, मोदींचं विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच; वाचा 8 मुद्दे