Pune : Hydrolic Lift बसवण्याकरीता शिवभक्ताचं Junnar इथं आमरण उपोषण

| Updated on: Mar 24, 2022 | 5:10 PM

जुन्नर (Junnar) नगरपरिषदेने मध्यवर्ती चौकात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) नव्याने पुतळा बसवला आहे. मात्र या पुतळ्याची स्वच्छता तसेच इतर धार्मिक विधीसाठी हायड्रॉलिक लिफ्ट (Hydrolic Lift) बसविण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून होत आहे.

जुन्नर (Junnar) नगरपरिषदेने मध्यवर्ती चौकात किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजीमहाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा बसवला होता. मात्र जुना पुतळा जीर्ण झाल्याने जुना पुतळा काढुन आता नव्याने पुतळा बसवला आहे. मात्र या पुतळ्याची स्वच्छता तसेच इतर धार्मिक विधीसाठी हायड्रॉलिक लिफ्ट (Hydrolic Lift) बसविण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून होत आहे. शिवभक्तांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. कागदपत्रांचा पाठपुरावा करूनदेखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. केवळ कागदी घोडे नाचवले जात आहेत. याच्या निषेधार्थ जुन्नर येथील ओंकार चंद्रकांत जोशी यांनी या मागणीबाबत ठाम भूमिका घेऊन या पुतळ्याजवळ हायड्रॉलिक लिफ्ट बसविण्यात यावी, या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या पवित्र कार्यात सर्व शिवभक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन ओंकार जोशी यांनी केले आहे.