Nanded | Banjara संस्कृती जोपासण्यासाठी Kinwatच्या सारखणीत लेंगी स्पर्धा
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट (Kinwat) तालुक्यातील सारखणी इथे सेवालाल (Sevalal) महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात लेंगी स्पर्धा घेण्यात येतेय. या लेंगी स्पर्धेत पारंपरिक वेशभूषेत बंजारा महिला लेंगी गीतांचे गायन करतात.
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट (Kinwat) तालुक्यातील सारखणी इथे सेवालाल (Sevalal) महाराजांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात लेंगी स्पर्धा घेण्यात येतेय. या लेंगी स्पर्धेत पारंपरिक वेशभूषेत बंजारा महिला लेंगी गीतांचे गायन करतात. बंजारा संस्कृती जोपासण्यासाठी आयोजित केलेल्या या लेंगी स्पर्धेत शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले आहेत. या लेंगी स्पर्धेत भक्तिरस, वीररस, ममत्व, प्रेम, जिव्हाळा त्याग आणि समर्पण आदी भाव व्यक्त होत असतात. बंजारा संस्कृतीत अत्यंत प्राचीन वारसा लाभलेल्या लेंगी स्पर्धेत उत्कृष्ठ सादरीकरण करणाऱ्याला बक्षीस देऊन गौरवण्यात येते. त्यासाठी बंजारा समाजाचे अभ्यासक स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नेमण्यात आले. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. महिलांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. पाच पंचांची कमिटी होती. विषयानुरूप सादरीकरण करण्यात आले. संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले.