Sindhudurg | एसटी महामंडळाकडून कंत्राटी पद्धतीनं 25 चालकांची भरती
सिंधुदुर्गात (Sindhudurg) एसटी (ST) कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाने कंत्राटी (Contract) पद्धतीने चालक भरती सुरू केली आहे. या भरतीला चांगला प्रतिसाद लाभला असून 25 चालकांच्या भरतीसाठी 89 अर्ज प्राप्त झाले आहेत.
सिंधुदुर्गात (Sindhudurg) एसटी (ST) कर्मचारी संपावर ठाम असल्याने एसटी महामंडळाने कंत्राटी (Contract) पद्धतीने चालक भरती सुरू केली आहे. या भरतीला चांगला प्रतिसाद लाभला असून 25 चालकांच्या भरतीसाठी 89 अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात 15 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या असून आता 32 जणांना शनिवारी टेस्टसाठी बोलावण्यात आले आहे. त्यातील 10 जणांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने संपात असलेल्या कर्मचाऱ्यांना हजर होण्यासाठी केलेल्या आवाहनाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मागील काही महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. विलीनीकरण मागणी वगळता सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मात्र कर्मचाऱ्यांनी आठमुठी भूमिका कायम ठेवल्याने आधीच तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत भरच पडत चालली आहे, त्यामुळे सरकारने शेवटी हा निर्णय घेतला.