Ambarnath | 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीचा रुद्राभिषेक
अंबरनाथच्या (Ambarnath) 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला (Mahashivrarti) लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर (Temple) भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अंबरनाथच्या (Ambarnath) 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला (Mahashivrarti) लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर (Temple) भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री 12 वाजता अंबरनाथ गावातील शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने शिवमंदिरात रुद्राभिषेक आणि महाआरती केली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलंय. त्यामुळं भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये, तसंच भाविकांनी घरीच भोलेनाथाची पूजा करावी, असं आवाहन मंदिराचे परंपरागत पुजारी विजय पाटील यांनी केलं आहे. मात्र दुसरीकडे बाजारात आणि आणि ठिकाणी गर्दी होत असताना फक्त मंदिरात आल्यावरच कोरोना होतो का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला. दरम्यान, मंदिर परिसरात पोलिसांनीही कडक बंदोबस्त लावला असून कुणालाही मंदिर परिसरात येऊ दिलं जात नाहीये.