Rumors | औरंगाबाद जिल्ह्यात नंदी दूध पीत असल्याची अफवा

| Updated on: Mar 06, 2022 | 3:45 PM

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात नंदी दूध (Milk)  पीत असल्याची पसरली अफवा पसरली आहे. अनेक गावात नंदी दूध पीत असल्याची ही अफवा वेगाने पसरत आहे. यामुळे अनेक गावांतील मंदिरात (Temples) गर्दी झाली आहे.

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात नंदी दूध (Milk)  पीत असल्याची पसरली अफवा पसरली आहे. अनेक गावात नंदी दूध पीत असल्याची ही अफवा वेगाने पसरत आहे. यामुळे अनेक गावांतील मंदिरात (Temples) गर्दी झाली आहे. अनेक गावांतून नंदी दूध पितानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे मंदिरात भाविकही गर्दी करत आहेत. दरम्यान, वारंवार अशा अफवांचे प्रकार घडत आहे. जाणीवपूर्वक हे षडयंत्र आहे. सीबीआयने या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्ह्याचे सचिव हरीश केदार यांनी केली आहे. दरम्यान हा चमत्कार सिद्ध करून लेखी आव्हान प्रक्रिया पूर्ण करून 25 लाख रुपये मिळवा हे आव्हान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून देत आहे. ज्यांना वाटतं नंदीची मूर्ती पाणी दूध पीत आहे त्यांनी हे आव्हान स्वीकारावं व्हिडिओ व्हायरल करून समाजाची दिशाभूल करू नये, जादू विरोधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही हरीश केदार यांनी म्हटले आहे.

 

Pune metro | पुणे मेट्रोने प्रवास करताना नागरिकांनो या गोष्टींचे पालन जरुर करा; मेट्रो प्रशासनाने जारी केल्या सूचना
Vivek Khatavkar यांनी साकारला शहरातील पहिला सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा