Sanyogita Raje | ‘छत्रपती पराभूत झाल्यानंतर नवस मागणं सोडून दिलं पण…’

| Updated on: Mar 02, 2022 | 4:09 PM

पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje) यांनी माझ्या उपोषणासंदर्भात सिद्धीविनायक (Siddhivinayak) बाप्पाकडे नवस मागितला होता. त्यांना साथ देण्यासाठी मी आज त्यांच्यासोबत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आलो आहे, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) म्हणाले.

मी नेहमी फीट राहणारा व्यक्ती आहे, आमच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje) यांनी माझ्या उपोषणासंदर्भात सिद्धीविनायक (Siddhivinayak) बाप्पाकडे नवस मागितला होता. त्यांना साथ देण्यासाठी मी आज त्यांच्यासोबत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आलो आहे, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) म्हणाले. तर महाराज 2009 साली जेव्हा ते पराभूत झाले, तेव्हापासून मी नवस मागणं सोडून दिलं होतं, असे संयोगिताराजे म्हणाल्या. 3 दिवसांपासून ते उपोषण करत होते, त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मी सिद्धीविनायकाकडे साकडं घातलं होतं. मुंबईचं आराध्यदैवत सिद्धीविनायक आहे असं ऐकलं होतं, तेव्हा मी बाप्पाला नवस बोलले आणि ते पूर्ण झालं. माझी साथ देण्यासाठी राजे माझ्या सोबत इथे आले, असं यावेळी संयोगिताराजे म्हणाल्या. सिद्धीविनायकाच्या दर्शनावेळी दोघांनीही आपल्या मनातील भावना बोलून दाखवली.

वेळ निघून गेली अन् पीक पेरा नोंदणीचे महत्व कळाले, खरेदी केंद्रावर काय आहेत अडचणी?
Aurangabad | रखडलेल्या घरकुल योजनेसाठी आता मनपाची कसरत, आत्ता कुठे जमीन मिळाली, 31 मार्च पर्यंतच मुदत!