Vinayak Raut | ‘गोव्यात शिवसेनेला मिळणाऱ्या मतांचा फक्त अंदाज घ्यायचा होता’
चार राज्यात भाजपाला (BJP) मिळालेले हे यश म्हणजे मोदी लाट नसून EVMची लाट आहे, अशी टीका शिवसेनेचे सचिव आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे.
चार राज्यात भाजपाला (BJP) मिळालेले हे यश म्हणजे मोदी लाट नसून EVMची लाट आहे, अशी टीका शिवसेनेचे सचिव आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. पाच राज्यातून आलेल्या निवडणूक निकालांवर बोलताना खासदार विनायक राऊत यांनी शिवसेनेने गोव्यात आणि उत्तरप्रदेशात शिवसेनेच्या मतदारांमध्ये प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, जागरुकता निर्माण करण्यासाठी ही निवडणूक लढवल्याचे सांगितले. तसेच 2024पर्यंत शिवसेना राष्ट्रीय पक्ष म्हणून आकार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपाच्या रावसाहेब दानवे व नितेश राणेंनाही टोला लगावला आहे. गोव्यात केवळ पक्षाचा प्रचार करणे हा आमचा उद्देश होता. त्यामुळे सुपडा साफ असे म्हणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.