Activa गाडीत घुसला साप, सर्पमित्राकडून सापाची सुटका, Ambarnathमधली घटना
अंबरनाथ (Ambarnath) पूर्वेच्या मेफ्लॉवर गार्डन भागात राहणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अॅक्टिव्हा गाडीत आज सकाळी साप (Snake) शिरताना वॉचमनने बघितलं. यानंतर सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी तिथे धाव घेत मेकॅनिकच्या (Mechanic) मदतीनं गाडी उघडली आणि सापाची सुटका केली.
अंबरनाथ (Ambarnath) पूर्वेच्या मेफ्लॉवर गार्डन भागात राहणारे काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या अॅक्टिव्हा गाडीत आज सकाळी साप (Snake) शिरताना वॉचमनने बघितलं. यानंतर सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी तिथे धाव घेत मेकॅनिकच्या (Mechanic) मदतीनं गाडी उघडली आणि सापाची सुटका केली. तीन फूट लांबीचा हा साप धामण जातीचा बिनविषारी साप होता. सापाला गाडीतून बाहेर काढल्यानंतर साळवे यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेनंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. सकाळी घडलेल्या या घटनेने सापाविषयीची भीती जाणवली. समोरच्या चाकामधून हँडलकडे असणाऱ्या मधल्या भागात हा साप लपून बसला होता. त्यामुळे मेकॅनिकच्या मदतीने सापाला बाहेर काढण्यात आले. थंडीचे दिवस संपत आले असून आता उन्हाळा सुरू होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी साप बाहेर पडत असल्याचे दिसते.