Solapur : हवामान बदलामुळे डाळिंब बागा शेतकऱ्याकडून जमीनदोस्त
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmers) डाळिंबाने (Pomegranate) आधार दिला. मात्र मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका शेतीला (Farming) बसत आहे. ज्या फळबागा आहेत त्यावर दीर्घ परिणाम होऊ लागला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा शेतातून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.
पारंपरिक दुष्काळी असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmers) डाळिंबाने (Pomegranate) आधार दिला. मात्र मागील काही वर्षांपासून बदलत्या हवामानाचा फटका शेतीला (Farming) बसत आहे. यामुळे पिकांचे नुकसान होत आहे तर ज्या फळबागा आहेत त्यावर दीर्घ परिणाम होऊ लागला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा शेतातून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या खोड अळीने डाळिंब बागांना अडचणीत आणले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अनेक वर्ष जपलेल्या बागा या रोगामुळे करपू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी डाळिंब बागा काढून दुसऱ्या पिकाचा मार्ग शोधू लागले आहेत. एकतपुर येथील शहाजी बिले आणि सुनील आवताडे या शेतकऱ्यांनी डाळिंब बागा जमीनदोस्त केल्या आहेत. बदलत्या हवामानामुळे शेतकरी हतबल झाला आहे.