Holi Celebration | होळीनिमित्त Nandurbarमध्ये साखरेच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आदिवासी (Tribal) समाजामध्ये होळीला (Holi) महत्त्वाचे स्थान दिले जात असते. या होळीला लागणारे साहित्य त्यातीलच एक प्रमुख साहित्य म्हणजे साखरेपासून बनणारे हार कंगनाचे दागिने आहे.
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आदिवासी (Tribal) समाजामध्ये होळीला (Holi) महत्त्वाचे स्थान दिले जात असते. या होळीला लागणारे साहित्य त्यातीलच एक प्रमुख साहित्य म्हणजे साखरेपासून बनणारे हार कंगनाचे दागिने आहे. नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर हार कंगन दागिने बनवले जात असतात. साखरेपासून बनणाऱ्या हार कंगनाला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातदेखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या दागिन्यांच्या व्यवसाय केला जातो. विशेष म्हणजे हे दागिने मुस्लीम समाजाकडून बनवले जात असतात. होळीलाही या दागिन्यांची विशेष मागणी असते. दरम्यान दिवसेंदिवस होत असलेली महागाई ही या व्यवसायालाही ग्रहण लावणारी आहे. साखरेपासून बनणाऱ्या दागिन्यांच्या उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होत आहे.
Published on: Mar 17, 2022 05:13 PM