Mumbai Thane News शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक

| Updated on: Mar 02, 2025 | 6:07 PM

शिवसेना ठाकरे गटाने आज ठाण्यात सुसंवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. मात्र शिंदे गटाचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले असून आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमासमोर जोरदार घोषणाबाजी करत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबईच्या ठाणे परिसरात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आल्याचं सध्या बघायला मिळत आहे. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमासमोर हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचा ठाणे दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान आनंदाश्रमासमोर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. याठिकाणी नेते संजय राऊत, राजन विचारे देखील उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे. थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने सुसंवाद मेळावा आयोजित केलेला असल्याने दोन्ही गट आक्रमक झालेले बघायला मिळत आहे.

Published on: Mar 02, 2025 06:07 PM
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मौन सोडले, ‘माझा कार्यकर्ता असेल तर…’
ठाण्यात मोठा राडा; शिवसेना शिंदे गट अन् ठाकरे गट आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी