Aurangabad | हेलिकॉप्टरमधून सासरी जाणाऱ्या लेकीला निरोप देण्यासाठी अख्खं गाव हेलिपॅडवर

| Updated on: Feb 26, 2022 | 5:44 PM

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील करमाड (Karmad) गावांमध्ये एका नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकाप्टर (Helicopter) आणलं होतं. मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावावरून हेलिकॉप्टर फिरवत नवरदेव नवरीला सासरी घेऊन गेलाय.

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील करमाड (Karmad) गावांमध्ये एका नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकाप्टर (Helicopter) आणलं होतं. मोठ्या थाटामाटात संपूर्ण गावावरून हेलिकॉप्टर फिरवत नवरदेव नवरीला सासरी घेऊन गेलाय. राम लांडे असं नवरदेवाचं नाव आहे. तर चित्रा कोरडे असं नवविवाहित नवरीचं नाव आहे. हॅलिकॉप्टरमध्ये बसून सासरी जाणाऱ्या आपल्या लेकीला निरोप देण्यासाठी अख्खं गाव हेलिपॅडवर लोटलं होतं. या नवरदेव नवरीची झलक खास टीव्ही9च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत. आपलं लग्न संस्मरणीय व्हावं, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. नवरदेव राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं विविध विवाहसोहळ्याला उपस्थित असतो. त्यातूनच ही संकल्पना सुचली. आपला विवाहसोहळा कायम आठवणीत राहावा, असं वाटत असल्याचं नवदेव म्हणाला. तर आपण सुखावल्याचं नवरी म्हणाली.

मीडियात राहण्यासाठी काहींची केविलवाणी धडपड, वरुण सरदेसाई केडीएमसीच्या रणमैदानात, थेट रवींद्र चव्हाणांवरच हल्लाबोल
PM Kisan : 48 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही 10 हप्ता, योजनेचा लाभ घ्यायचा आहे मग ‘ही’ प्रक्रिया कराच..!