Gudhi padwa : ऐन सणासुदीत साखर हारांची किंमत गगनाला

| Updated on: Mar 28, 2022 | 4:56 PM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या (Gudhipadva) सणाला साखर (Suger) हारांना मोठे महत्त्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती (Price) गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या (Gudhipadwa) सणाला साखर (Suger) हारांना मोठे महत्त्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती (Price) गगनाला भिडल्याचे चित्र आहे. साखर आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने यंदा साखर गाठी हाराच्या दरात सुमारे चाळीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऐन गुडीपाडवा सणात सर्व सामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्चांक गाठला असून त्याचा फटका पंढरपुरातील साखर गाठी हार तयार करणाऱ्या व्यवसायिकांना ही बसला आहे. साखरे बरोबरच इतर कच्या मालाच्या दरात दुप्पट-तीप्पट वाढ झाली आहे. त्यातच गुजरात मधून आलेल्या साखर हाराचा ही स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. या वर्षी त्यांनी 35 क्विंटल साखरेपासून हार तयार केले आहेत. सध्या 100 ते 110 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. येथे तयार झालेले  हार पंढरपूर शहर व तालुक्यात विक्री  होते. दरम्यान गुजरातमधून आलेल्या साखर हाराच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे बाजारात या हारांना मागणी वाढली आहे. त्याचाही परिणाम स्थानिक व्यवसायावर झाल्याचे राजेंद्र कटकमवार यांनी सांगितले.
Published on: Mar 28, 2022 04:49 PM
VIDEO: यशवंत जाधवांच्या डायरीत ‘मातोश्री’चा उल्लेख, अजितदादा म्हणाले…
Aurangabad | औरंगाबादच्या पीटलाईनचा प्रस्ताव बारगळणार? रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष का? संघटनांचा संताप