Vivek Khatavkar यांनी साकारला शहरातील पहिला सिंहासनाधीश छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

| Updated on: Mar 06, 2022 | 3:58 PM

एकूण 2 टन ब्रॉंझचा शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यास 6 महिने लागले आहेत. साडे दहा फूट उंचीचा असा हा पुतळा तयार करण्यात आलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वखर्चातून हा पुतळा तयार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) आल्यानंतर सर्व प्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)  आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. शहरातील पहिला सिंहासनाधीश असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याचे बोलले जात आहे. एकूण 2 टन ब्रॉंझचा शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यास 6 महिने लागले आहेत. साडे दहा फूट उंचीचा असा हा पुतळा तयार करण्यात आलाय. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वखर्चातून हा पुतळा तयार केला आहे. विवेक खटावकर यांनी याविषयीची माहिती दिली. खटावकर हे शिल्पकार असून त्यांचा मुलगा विपुल खटावकर यांनी हा पुतळा साकारला आहे. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Rumors | औरंगाबाद जिल्ह्यात नंदी दूध पीत असल्याची अफवा
Sharad Pawar in Osmanabad | ‘निकालाआधीच मी येणार असं सांगत होते, पण मी पुन्हा येऊ दिलं नाही’