Satara : देगावमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, महिलेनं आयोजित केली स्पर्धा
सातारा (Satara) येथील देगावमध्ये बैलगाडी शर्यतीचा (Bullock cart Race) थरार रंगला. प्रथमच एका महिलेने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा झाली.
सातारा (Satara) येथील देगावमध्ये बैलगाडी शर्यतीचा (Bullock cart Race) थरार रंगला. प्रथमच एका महिलेने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्यतारा केसरी बैलगाडी शर्यत आयोजिक करण्यात आली होती. या अजिंक्यतारा केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ महिला आयोजिका सातारा डीसीसी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांचे हस्ते झाला. राज्यात प्रथमच एका महिलेने बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले असून शर्यत जिंकणाऱ्या बैलगाड्यांना एकूण पाच तोळे सोने, सात चांदीच्या गदा बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी प्रयत्न केले होते. देशी गोधन वाचण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. याची जाणीव ठेऊन बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजिका कांचन साळुंखे यांनी दिली.