Adv. Gunaratna Sadavarte | वकील गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेची निवडणूक लढणार – tv9
वकील गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी सक्रिय झाले आहेत.
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunranta Sadavrte) आता एसटी बँकेची (ST Bank) निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी एसटीच्या कामगारांचा पाच महिने संप केल्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आता एसटी बँकेच्या निवडणुकीला (Bank Election) टार्गेट केलंय. याकरता सदावर्ते स्वतःचे पॅनल उभं करण्याच्या तयारीत आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते 26 एप्रिल रोजी जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर ते आता पुन्हा एसटीच्या कामगारांसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र ही भूमिका ते आंदोलनातून मांडणार की नवी राजकीय कारकीर्द सुरु करणार हे मात्र स्पष्ट नव्हते. मात्र आता गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालंय. सदावर्ते हे एसटी बँकेच्या निवडणुकीत आपले स्वतःचे पॅनल उभे करणार असून तशी तयारी देखील त्यांनी सुरु केली आहे. एसटी बँकेचे राज्यात तब्बल 90 हजार मतदार आहेत. सध्या या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. मात्र याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी रणशिंग फुंकलंय. आगामी निवडणुकीमध्ये त्यांचे उमेदवार नेमकी काय वेगळी जादू करतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.