Urfi Javed : उर्फीनं नीट कपडे घालूनच प्रकरण मिटवावं, चित्रा वाघ यांचा सल्ला
उर्फी जावेद-चाकणकरांच्या भेटीबाबत चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
अभिनेत्री उर्फी जावेद ही राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची भेट घेणार आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर केलेल्या आरोपानंतर आता उर्फी जावेद रूपाली चाकणकरांच्या भेटीला जाणार आहे.
राज्य महिला अयोगाच्या कार्यालयात उर्फी जावेद रूपाली चाकणकरांची भेट घेणार आहे. दरम्यान उर्फी जावेद-चाकणकर यांच्या भेटीबाबत चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत वक्तव्य करताना असे म्हटले की, उर्फी कुठेही जाऊदे पण तिने नीट कपडे घालावे, तर उर्फीने नीट कपडे घालूनच हे प्रकरण मिटवावं असा सल्लाही त्यांनी उर्फीला दिला आहे.
उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाला घेरले. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “मला अशा नोटीसा रोज येत असतात. त्यात अजून एक आली. त्यात विशेष काही नाही. माझा आक्षेप आयोगावर नाही, तर अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आहे”