Eknath Shinde: कार्यकर्त्याचं प्रेम बघा! डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा

| Updated on: Jul 10, 2022 | 12:26 PM

शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा आहे. या तरुणाने डोक्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिमा आणि गळ्यात शिवसेनेचं उपरणं घातलंय. शिंदे गट अजूनही स्वतःला शिवसेना असल्याचंच म्हणतोय त्यामुळे या मेळाव्यात शिवसेना लिहीलेले उपरणं वाटण्यात आलेत.

पंढरपूर: मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा पंढरपूरात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय. मेळाव्याला तरुणांची गर्दी जमलेली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चाहत्याने डोक्यावर एकनाथ शिंदेंचा चेहरा कोरून घेतलाय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं जबरदस्त फॅन फॉलोईंग (Eknath Shinde Fan Following) दिसून येतंय. ही दृश्य अर्थातच पंढरपूरातली (Pandharpur) आहेत. शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा आहे. या तरुणाने डोक्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिमा आणि गळ्यात शिवसेनेचं उपरणं घातलंय. शिंदे गट अजूनही स्वतःला शिवसेना असल्याचंच म्हणतोय त्यामुळे या मेळाव्यात शिवसेना लिहीलेले उपरणं वाटण्यात आलेत.

Published on: Jul 10, 2022 12:24 PM
Aurangabad : आता शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये , औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना काय देणार कानमंत्र?
BMC Election 2022, TPS Colony ward no 130: आरक्षणाचा फटका! वॉर्ड क्र. 130 मध्ये होणार रंगतदार चुरस