समाजात तेढ निर्माण होईल असं विधान राज्यपाल करत आहेत – सुप्रिया सुळे
पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं विधान राज्यपाल करत आहेत. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
मुंबई: राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं विधान राज्यपाल करत आहेत. हे योग्य नाही. असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी केलंय. “राज्यपाल हे पद संविधानिक आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणं उचित नाही. पण महाराष्ट्राचे राज्यपाल सतत वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची वेळ येते. त्यांच्या या विधानाचा मी निषेध करते. राज्यात आपण सगळ्या समाजाचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतो. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असं विधान राज्यपाल करत आहेत. हे योग्य नाही. बहोत हो गया, राज्यपालांना उत्तराखंडला परत पाठवा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Published on: Jul 30, 2022 12:17 PM