माझा विनायक मेटे करण्याचा डाव, अशोक चव्हाण यांचा गंभीर आरोप कोणावर?

| Updated on: Feb 20, 2023 | 7:56 PM

माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. आपल्यावर काही लोकं पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर दावा अशोक चव्हाण यांनी केलाय.’ आज सांयकाळी नांदेड जिल्ह्यातील कारेगांव इथे चव्हाण यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना चव्हाण यांनी आपला घातपात घडवण्याची भीती पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या पूर्वी आज दुपारीच अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन याच स्वरूपाची तक्रार केली होती. माझ्या लेटर पॅडचा दुरुपयोग होत असून माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Published on: Feb 20, 2023 07:56 PM
उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ एकनिष्ठ आमदाराने एकनाथ शिंदे यांचे वाढवलं टेन्शन, पहा काय आहे प्रकरण ?
Jitendra Awhad | ‘निवडणूक आयोग कधीच बरखास्त होऊ शकत नाही’ – जितेंद्र आव्हाड