Video | लव्ह जिहाद आणि आंतरधर्मीय विवाहाबाबत विधेयक? अनिल बोंडेनी सविस्तर सांगितलं…

| Updated on: Sep 15, 2022 | 3:48 PM

50 हजार रुपयांत ते एका तासाच्या आत विवाह लावून देत होते. या गोष्टी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत. कायद्याच्या कचाट्यात आणल्या पाहिजेत, यासाठी मी राज्यसभा सदस्य म्हणून प्रयत्न करणार आहे, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय.

अमरावतीः अमरावती आणि आदिवासी परिसरात प्रलोभनं देऊन लव्ह जिहादसारख्या (Love Jihad) घटनांची वाढ झाल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलाय. तसेच या भागात धमकी आणि प्रलोभनं दाखवून आंतरधर्मीय विवाहांच्या घटानही वाढल्या आहेत, त्यामुळे लवकरच या संबंधी विधेयक मांडणार असल्याचं बोंडे यांनी सांगितलं. या घटना सुनियोजित आणि प्रोत्साहन दिलं जातं. त्या थांबवण्यासाठी मी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे एका जिल्ह्यातील तरुण-तरुणी दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन विवाहाची नोंद करतात,त्यामुळे यासंबंधी काही कायदेशीर तरतूदी आवश्यक आहेत, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय.

‘पालकांना सूचना देणे आवश्यक’

अमरावतीचं कुटुंब बुलडाण्यात रजिस्टर करतात. त्यामुळे असं न होता एक महिन्याची सूचना मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना रजिस्ट्रार ऑफ मॅरेजने दिली पाहिजे. ज्या बोगस संस्था विवाह लावून देतात, किंवा बोगस मौलाना असे लग्न लावून देतात, ते वैध मानता कामा नये. अमरावतीतली चंद्रविला नावाची संस्था पकडण्यात आली. महेश देशमुख नावाच्या वकिलाला पकडण्यात आलं.
50 हजार रुपयांत ते एका तासाच्या आत विवाह लावून देत होते. या गोष्टी गांभीर्यानं घेतल्या पाहिजेत. कायद्याच्या कचाट्यात आणल्या पाहिजेत, यासाठी मी राज्यसभा सदस्य म्हणून प्रयत्न करणार आहे, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलंय.

Published on: Sep 15, 2022 03:46 PM
Vedanta Project : राज्यात डबल इंजिनचे सरकार अन् फायदा गुजरातला, चव्हाणांनी सांगितली वेदांता प्रकल्पाच्या पडद्यामागची गोष्ट
ठाकरे सरकारवर खापर फोडणं अयोग्य- शरद पवार