Video | हिंदु धर्म वाचवा हो, पण यांचे जीव कोण वाचवणार? या गावकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना सवाल
फक्त शाळकरी विद्यार्थीच नाही तर वस्तीवरील इतर नागरिकांचेही हाल होतात. शेतकऱ्यांचे शेत ओढ्याच्या अलीकडे असल्यावर त्यांना ओढा ओलांडून जाता येत नाही.
सांगलीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) नुकतीच घोषणा केली आहे. हिंदु धर्म वाचवायचा आहे, असं ते म्हणतात. तुम्ही धर्म वाचवा हो, पण आधी खेडोपाडीच्या मुलांचे काय हाल होतायत? शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज जीव मुठीत घेऊन जावं लागतं, याकडे लक्ष द्या, अशी आर्त हाक सांगलीतल्या एका गावकऱ्याने दिली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील (Aatpadi Taluka) वाक्षेवाडी गावामधील सावळा वस्ती ही गावापासून काही अंतरावरती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी ओढ्यातून जावे लागते. जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही पावसाळ्यामध्ये ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यावर गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो. वस्तीवरील शाळकरी मुलांना शाळेसाठी या ओढ्यातून जीवघेणी कसरत करून यावे लागते.
फक्त शाळकरी विद्यार्थीच नाही तर वस्तीवरील इतर नागरिकांचेही हाल होतात. शेतकऱ्यांचे शेत ओढ्याच्या अलीकडे असल्यावर त्यांना ओढा ओलांडून जाता येत नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. स्थानिक प्रतिनिधींना वेळोवेळी रस्त्याबाबत पाठपुरावा करून सुद्धा प्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत, असं गाऱ्हाणं या गावकऱ्यानं मांडलं आहे.