Ramdas Athawle | शिवसेनेनं पाप केलं आणि काँग्रेस, NCP सोबत युती केली! आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला
सांगलीतील आटपाडी येथे आयोजीत निर्धार सभेत बोलत असताना. रामदास अठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर टिका केली आहे.
सांगली – शिवसेनेनी पाप केलं. कॉग्रेस, राष्ट्रावादी सोबत युती केली. माननीय बाळा साहेब ठाकरेंनी शिवशक्ती भिमशक्ती भूमिका मांडली माझ्या समोर. म्हणून शिवशक्ती भिमशक्तीचा प्रयोग यामहाराष्ट्रात झाला. बाळासाहेब मला म्हणायचे तुम्ही आमच्या सोबत या. याशिवशक्ती सोबत भिमशक्ती आली की बघा काय प्रयोग महाराष्ट्रात होतोय ते. या महाराष्ट्रात सत्ता बद्दल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. बाळासाहेब ठाकरे यांनी भीम शक्ती आणि शिव शक्ती अशी भूमिका मांडली. मी काँग्रेस पक्ष्यात होतो. पवार साहेबाच्या सोबत होतो. पण मला हरवले आणि मी ठरवले आणि भीम शक्ती आणि शिव शक्ती झाली. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते आणि सत्ता आली. मी काँग्रेस मध्ये होते तेव्हा त्यांना सत्ता मिळाला. मी त्यांना सोडल्यावर त्यांना सत्तेतून बाहेर केले. पण शिवसेनेने पाप केले आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. आता मुख्यमंत्री पद मिळाले. पण मुख्यमंत्री मिळाले असले तरी एका चक्रव्यूहात आहेत. एका बाजूला काँग्रेस दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. मी मुख्यमंत्री यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण काही जमत नाही. पण ठीक आहे. तुम्ही त्या ठिकाणी सुखानी राहावा नांदा पण होऊ देऊ नका वांदा.