Video | मी म्हटलं होतं... राष्ट्रवादी सोडा, आमदारांना तुमच्या पायाशी आणतो, बंडखोर शिवसेना नेत्यानं सांगितला तो प्रसंग
रामदास कदम, शिवसेना नेते
Image Credit source: tv9 marathi

Video | मी म्हटलं होतं… राष्ट्रवादी सोडा, आमदारांना तुमच्या पायाशी आणतो, बंडखोर शिवसेना नेत्यानं सांगितला तो प्रसंग

| Updated on: Sep 17, 2022 | 5:05 PM

रामदास कदम म्हणाले, आमदार गुवाहटीत गेले होते तेव्हा उद्धव ठाकरे मला फोन करत होते. मी उचलला नाही. पण माझ्या मुलाच्या शब्दाखातर मी बोललो....

मुंबईः मागची अडीच वर्ष बाप मुख्यमंत्री आणि बेटा कॅबिनेट मंत्री.. या दोघांनी आमदार-खासदार-मंत्र्यांशी संपर्कच ठेवला असता तर आज असं भटकण्याची गरज पडली नसती. अनेक गोष्टींचे आम्ही साक्षीदार आहोत. तोंड उघडायला लावू नका. फक्त 50 आमदारांनी तुमची सत्ता खाली खेचली. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) सत्ता खाली खेचली, असा आरोप बंडखोर शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला. आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) कोकण दौऱ्यात आमदारांनी (Shivsena MLA) खोके घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केला. यावर बोलताना रामदास कदमांनी आमदार गुवाहटी गेल्याचा प्रसंग सांगितला.

रामदास कदम म्हणाले, आमदार गुवाहटीत गेले होते तेव्हा उद्धव ठाकरे मला फोन करत होते. मी उचलला नाही. पण माझ्या मुलाच्या शब्दाखातर मी बोललो. राष्ट्रवादीची साथ सोडायची असेल तर सांगा. मी फोन करतो आणि आत्ता सगळ्या आमदारांना तुमच्या पायाशी आणतो, असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे तयारही झाले. पण अचानक शरद पवार मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंनी निर्णय बदलला, असा प्रसंग रामदास कदमांनी सांगितला.

पहा रामदास कदम काय म्हणाले?

Published on: Sep 17, 2022 04:59 PM
शिवसेना फोडण्याआधी इतिहास जाणून घ्या; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर जबरदस्त पलटवार
BMC : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट अन् शिवसेना आग्रही, महापालिका घेणार निर्णय..!