देशभरातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ, दिल्लीतही सापडला 1 ओमिक्रॉनबाधित रुग्ण
नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
मुंबई :
नवी दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये 2, गुजरातच्या जामनगरमध्ये 1 आणि महाराष्ट्रात एक आणि आता दिल्लीत एक अशा पाच रुग्णांची नोंद झाली आहे. परदेशातून आलेल्या 17 जणांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे.