TET Exam | टीईटी परिक्षा गैरव्यवहारप्रकरणी तुकाराम सुपेंच्या घरी सापडली 1 कोटी 58 लाखांची रोकड
पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे.
पुणे: पुणे सायबर पोलिसांच्या (Pune Cyber Police) चौकशीत आरोग्य भरती प्रक्रियेतील पेपर फुटीनंतर तपास सुरु केला होता. त्या दरम्यान त्यांना म्हाडा परीक्षेचा पेपर फोडला जाणार असल्याची लिंक लागली. याचा तपास करताना महाटीईटी (MahaTET) परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि अभिषेक सावरीकर (Abhishek Savarikar) यांच्यासह आणखी एकाला अटक केली होती. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला. पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून 2 कोटी आणि सोनंही सापडलं असल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांना तुकारामा सुपेच्या घरात 2 कोटी रुपये सापडल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांनी सोनं देखील जप्त केलं आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.