T20 World Cup 2024 : वर्ल्डकप जिंकल्यानं विश्वविजेत्यांना शिंदे सरकारकडून बक्कळ पैसा, ‘या’ खेळाडूंना इतके कोटी

| Updated on: Jul 05, 2024 | 1:09 PM

वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आलाय

विजयी टीम इंडियाचं मुंबईत दणक्यात स्वागत झालं त्यानंतर विश्वविजेत्या खेळाडूंची जंगी विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडिअमवर झाली. तर वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी टीम इंडियाचा 125 कोटी रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून देखील विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठा पेटारा उघडण्यात आला आहे. टीम इंडियातील खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता विधानभवन येथे सेंट्रल हॉल येथे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

Published on: Jul 05, 2024 01:09 PM
Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या फॉर्मवरील ‘त्या’ फोटोंवरून राजकारण, अर्जावर कोणत्या नेत्यांचे चेहरे
T20 World Cup 2024 : वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक, म्हणाली…