नादच खुळा…असला बुके कधी पाहिलाय का? १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ अजितदादांना देणार
30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शिबिर सुरू आहे. NCP नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संवाद शिबीर होत आहे. कर्जत येथे अजित पवार गटाच्या शिबिरात तब्बल १ हजार ३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ अजित पवार यांना देण्यात येणार
कर्जत, १ डिसेंबर २०२३ : 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं शिबिर सुरू आहे. NCP नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संवाद शिबीर होत आहे. कर्जत येथे अजित पवार गटाच्या शिबिरात तब्बल १ हजार ३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ अजित पवार यांना देण्यात येणार आहे. हा विश्वविक्रमी १३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ अजितदादांना देण्यात येणार असल्यानं त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. गुलाबांच्या फुलांचा विश्वविक्रमी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अहमदनगरच्या डॉ दीपक हरके यांच्यावतीने अजितदादांना विक्रमी गुच्छ देऊन मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. तर या पुष्पगुच्छाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडनमध्ये करण्यात येणार आहे, असेही सांगितले जात आहे.
–
Published on: Dec 01, 2023 11:50 AM